Weather Update : सावधान, राज्याच्या या भागात आज गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काल शनिवारी (ता.25) राज्यातील कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, आज रविवारी (ता.26) सुद्धा खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तसेच लगतच्या नाशिक जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Warning of heavy rain with hailstorm today in this part of the state

हिवाळ्याची चाहुल लागत नाही तेवढ्यात राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून, काही भागात पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काल शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग तसेच चिपळूण भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. रात्रीही कुंडाळ, सावंतवाडी, कणकवली भागात जोरदार पाऊस कोसळला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातही शनिवारी रात्री काही क्षण अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबईत रविवारची सकाळ पाऊस घेऊनच उगवली. बऱ्याच ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने रविवारच्या सुटीमुळे बिनधास्त असलेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मीडीयाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, कांदिवली परिसरातही रिमझिम पाऊस बरसला.

या ठिकाणी आज रविवारी पावसाचा येलो अलर्ट

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी (ता.26) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच धुळे व नंदुरबार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यात पालघर, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांचा समावेश आहे.

WhatsApp Group
Previous articleRain Update : राज्याच्या या भागात आज विजांच्या कडकडाटासह पडला जोरदार पाऊस
Next articleJalgaon Polytics : जळगावचे राजकारण सुरेशदादांच्या भोवती पुन्हा केंद्रित होत आहे का ?