राज्यात जेऊरमध्ये निच्चांकी 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, थंडीची लाट

Weather Update : राज्यातील थंडीची लाट वाढली असून, गुरुवारी (ता.14) सकाळपर्यंतच्या 24 तासात जेऊरमध्ये निच्चांकी 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. याशिवाय विदर्भातील गोंदियामध्ये 13.2 अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीतही प्रत्येकी 13.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. कोकण किनारपट्टीचा भाग वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यातही किमान तापमानात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

In the state Jeur recorded a low of 10.1 degrees Celsius Temprature

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोकण किनारपट्टीच्या भागात अजुनही कमाल व किमान तापमान जास्तच आहे. विशेषतः रत्नागिरीत कमाल तापमान 33.0 अंश सेल्सिअस व किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील कुलाबा व डहाणू येथेही किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीत आढळले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मात्र रात्रीच्या तापमानाचा पारा बऱ्यापैकी खाली आला आहे. त्यामुळे त्या भागात थंडीची लाट आल्याची प्रचिती येऊ लागली आहे.

गुरुवारी (ता.14 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 28.8/14.3, जळगाव- 29.5/15.0, जेऊर- 31.0/10.1, महाबळेश्वर- 26.3/13.5, नाशिक- 28.8/14.2, मालेगाव- 27.4/16.0, सातारा- 30.2/15.3, कोल्हापूर- 29.7/17.5, सांगली- 29.6/17.1, सोलापूर- 32.0/17.8, छत्रपती संभाजीनगर- 28.0/14.6, बीड- 28.7/15.2, नांदेड- 29.2/16.6, परभणी- 28.7/15.5, अकोला- 31.0/17.2, अमरावती- 28.8/15.3, बुलडाणा- 28.6/15.0, चंद्रपूर- 28.4/13.6, गडचिरोली- 28.6/13.6, गोंदिया- 27.4/13.2, नागपूर- 28.7/14.4, वर्धा- 28.5/16.0, यवतमाळ- 30.7/16.5, रत्नागिरी- 33.0/21.5, डहाणू- 30.5/20.6, मुंबई- 30.8/22.8

WhatsApp Group
Previous article‘माविम’च्या महिला बचतगटांनाही फिरता निधी देण्यासाठी हालचाली सुरू
Next articleबऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत सतराशे विघ्न