विदर्भात थंडीची लाट, गोंदियात निच्चांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update : राज्यातील विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वदूर थंडीची लाट आली असून, शुक्रवारी (ता.15) सकाळपर्यंतच्या 24 तासात गोंदियात निच्चांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीचा भाग वगळता इतर ठिकाणी किमान तापमानात देखील बऱ्यापैकी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Cold wave in Vidarbha, Gondia records low of 12.2 degrees Celsius

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतेक जिल्ह्यात थंडीची चाहुल लागलेली असली तरी कमाल तापमानात अद्याप फार खाली आलेले नाही. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री बोचरी थंडी, असे वातावरण सध्या सगळीकडे अनुभवण्यास मिळत आहे. विशेषतः डहाणूत सर्वाधिक 34.0 तसेच रत्नागिरीत 33.5, कुलाबा मुंबई येथे 32.6, यवतमाळ येथे 30.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान हे 30.0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविले गेले आहे.

शुक्रवारी (ता.15 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 28.0/13.3, जळगाव- 29.3/14.3, कोल्हापूर- 28.1/16.1, महाबळेश्वर- 23.6/12.5, नाशिक- 28.0/14.2, पुणे- 28.8/12.3, सांगली- 27.9/14.9, सातारा- 29.0/13.2, सोलापूर- 30.4/16.0, अकोला- 30.1/15.8, अमरावती- 28.4/15.1, बुलडाणा- 28.2/14.2, चंद्रपूर- 28.0/13.0, गोंदिया- 27.2/12.2, नागपूर- 28.9/12.8, वर्धा- 28.5/14.6, वाशिम- 29.8/13.4, यवतमाळ- 30.5/13.5, छत्रपती संभाजीनगर- 27.6/13.5, बीड- 28.2/14.2, नांदेड- 28.8/15.0, परभणी- 28.4/14.2, डहाणू- 34.0/20.5, मुंबई- 32.6/22.8, रत्नागिरी- 33.5/21.4

WhatsApp Group
Previous articleपाल येथील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामीण तरूणांसाठी मोफत मशरूम उत्पादन प्रशिक्षण
Next articleशेवरीच्या झाडांमधील गावरान कोंबडीपालनातून लाखो रूपयांचा नफा