विदर्भातील गडचिरोली येथे निच्चांकी 12.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update : राज्यातील विदर्भात चंद्रपूर तसेच गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम येथे पुन्हा थंडीचा गारठा वाढला असून, सोमवारी (ता.18) सकाळपर्यंतच्या 24 तासात गडचिरोली येथे निच्चांकी 12.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. तुलनेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण तसे कमीच आहे. दरम्यान, राज्यात सर्वदूर कमाल व किमान तापमानात मोठे चढउतार अनुभवण्यास मिळाले आहेत.

Gadchiroli in Vidarbha recorded a low of 12.0 degrees Celsius.

सोमवारी (ता.18 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला- 29.2/15.3, अमरावती- 27.4/14.9, बुलडाणा- 26.8/14.0, चंद्रपूर- 28.6/13.0. गडचिरोली- 28.8/12.0, गोंदिया- 26.4/12.5, नागपूर- 27.6/12.8, वर्धा- 28.0/13.6, वाशिम- 27.8/12.8, यवतमाळ- 29.0/13.0, छत्रपती संभाजीनगर- 27.0/15.4, बीड- 27.3/16.4, परभणी- 27.5/15.9. उदगीर- 27.0/14.5, कोल्हापूर- 26.1/19.1, महाबळेश्वर- 23.9/13.5, नाशिक- 26.3/14.2, मालेगाव- 26.0/14.6, सांगली- 26.2/18.9, सातारा- 27.9/18.5, सोलापूर- 28.9/19.8

WhatsApp Group
Previous articleकोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरतील कापसाच्या ‘या’ तीन नवीन जाती
Next articleकापसाला ‘कोणत्या’ राज्यात मिळाला सर्वाधिक 9100 रूपये प्रतिक्विंटल भाव ?