Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमान 9.0 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उर्वरित जिल्ह्यात मात्र कमाल व किमान तापमानात खूपच चढउतार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीच्या भागात दिवसाचे कमाल तापमान 30 अंशापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तच असून, तिथे दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत.
Gondia, Gadchiroli, Chandrapur in Vidarbha experienced severe cold
गुरूवारी (ता. 21 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
चंद्रपूर- 26.4/9.2, गडचिरोली- 25.6/9.0, गोंदिया- 26.0/9.0, नागपूर- 26.0/10.6, अकोला- 26.3/12.8, अमरावती- 26.8/11.2, बुलडाणा- 25.8/12.8, वर्धा- 25.4/12.0, वाशिम- 26.6/12.8, यवतमाळ- 26.0/9.5, छत्रपती संभाजीनगर- 26.4/13.6, परभणी- 26.9/12.9, अहमदनगर- 28.0/14.3, कोल्हापूर- 27.9/17.0, महाबळेश्वर- 25.7/14.6, नाशिक- 25.8/15.0, सांगली- 28.1/16.0, सातारा- 29.6/16.6, सोलापूर- 30.0/17.0, डहाणू- 31.0/21.1, मुंबई- 30.8/23.2, रत्नागिरी- 34.4/23.5