जळगावमध्ये सोमवारी सकाळी निच्चांकी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद

Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.25) सकाळी जळगावमध्ये निच्चांकी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीअंशी चढउतार अनुभवण्यास मिळाला आहे. कोकण किनारपट्टीसह सोलापूर भागात कमाल तापमानाचा पारा 32 अंशापेक्षा जास्त आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण निवळल्यानंतरच थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jalgaon recorded a low of 9.6 degrees Celsius on Monday morning

सोमवारी (ता. 25 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 31.1/9.6, कोल्हापूर- 29.2/16.4, महाबळेश्वर- 27.1/14.9, मालेगाव- 27.8/13.2, नाशिक- 29.7/12.5, पुणे- 29.9/11.7, सांगली- 30.0/15.0, सातारा- 30.9/13.8, सोलापूर- 32.1/16.4, अकोला- 31.3/13.5, अमरावती- 29.6/13.3, बुलडाणा- 30.6/13.8, चंद्रपूर- 29.0/11.4, गडचिरोली- 29.2/12.0, गोंदिया- 28.0/10.5, नागपूर- 29.0/13.7, वर्धा- 29.0/14.0, वाशिम- 30.8/11.6, यवतमाळ- 30.5/12.2, छत्रपती संभाजीनगर- 29.2/12.1, बीड- 28.4/12.5, परभणी- 29.1/13.4, डहाणू- 31.0/18.1, मुंबई- 32.6/21.8, रत्नागिरी- 34.1/20.7

WhatsApp Group
Previous articleदेशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 125 रुपयांचे नाणे चलनात येणार
Next articleसौदर्य प्रसाधने, औषधी निर्मितीसाठी भारतीय हळदीला युरोप, अमेरिकेत मागणी