Weather Update : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्याने राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले असून, कमाल तापमानातही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.26) सकाळी विदर्भातील गोंदियामध्ये निच्चांकी 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. खालोखाल खान्देशातील जळगावमध्ये 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये तुलनेत 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी (ता. 26 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 30.4/11.9, कोल्हापूर- 30.4/17.1, महाबळेश्वर- 29.1/16.2, मालेगाव- 28.8/13.6, नाशिक- 31.2/12.6, सांगली- 30.7/15.2, सातारा- 32.0/14.2, सोलापूर- 33.4/16.0, अकोला- 32.3/14.1, अमरावती- 29.8/14.3, बुलडाणा- 31.0/14.0, चंद्रपूर- 28.8/12.0, गडचिरोली- 30.2/12.2, गोंदिया- 28.8/11.4, नागपूर- 29.8/14.2, वर्धा- 30.0/14.0, वाशिम- 31.6/12.6, यवतमाळ- 31.6/12.5, छत्रपती संभाजीनगर- 29.8/12.6, बीड- 29.4/13.5, नांदेड- 29.6/14.2, परभणी- 30.2/13.2, उदगीर- 31.0/13.0. डहाणू- 30.3/18.6, मुंबई- 32.8/21.8, रत्नागिरी- 35.6/20.9