Weather Update : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्याने राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.27) सकाळी जळगाव तसेच गोंदिया व गडचिरोली वगळता राज्यातील उर्वरित भागात किमान तापमान हे 13.0 अंश सेल्सिअसपेक्षा जास्तच होते. कोकण किनारपट्टीच्या भागातील रत्नागिरीत सर्वाधिक 35.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.
Increase in minimum temperature in rest of the state except Jalgaon, Gadchiroli, Gondia
बुधवारी (ता. 27 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 31.0/13.4, जळगाव- 30.2/12.6, कोल्हापूर- 31.1/17.0, महाबळेश्वर- 28.8/16.1, नाशिक- 32.9/14.2, सांगली- 31.0/15.1, सातारा- 33.1/13.5, सोलापूर- 33.2/16.1, छत्रपती संभाजीनगर- 31.2/13.6, बीड- 29.7/13.3, परभणी- 31.0/14.5, अकोला- 32.5/14.3, अमरावती- 30.2/15.0, बुलडाणा- 31.0/14.8, चंद्रपूर- 29.2/12.4, गडचिरोली- 29.6/12.6, गोंदिया- 28.6/12.4, नागपूर- 29.9/14.6, वर्धा- 30.0/14.6, वाशिम- 30.8/13.4, यवतमाळ- 32.0/13.2, डहाणू- 33.0/19.0, मुंबई- 33.2/22.2, रत्नागिरी- 35.6/19.8