गावशिवार न्यूज | अहमदनगर आणि पुणे वगळता महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अहमदनगरात सर्वात कमी 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील आणि 4 ते 7 जानेवारी दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज (Weather Update) हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मंगळवारी (ता. 02 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 29.0/12.5, जळगाव- 30.4/15.2, कोल्हापूर- 29.9/17.8, महाबळेश्वर- 27.5/15.0, मालेगाव- 29.2/17.2, नाशिक- 30.4/14.5, पुणे- 31.5/13.6, सांगली- 29.8/16.8, सातारा- 30.7/14.1, सोलापूर- 32.0/17.0, अकोला- 30.9/16.4, अमरावती- 29.6/15.3, बुलडाणा- 29.4/16.7, चंद्रपूर- 28.8/14.4, गडचिरोली- 30.2/14.6, गोंदिया- 27.8/14.0, नागपूर- 28.8/14.4, वर्धा- 29.0/14.9, वाशिम- 30.2/15.6, यवतमाळ- 30.5/16.5, छत्रपती संभाजीनगर- 29.2/14.9, बीड- 29.9/15.9, परभणी- 29.9/16.1, डहाणू- 29.9/19.7, मुंबई- 32.0/22.0, रत्नागिरी- 35.0/19.8