गावशिवार न्यूज | थंडीचा गारठा कमी होऊन कमाल तापमानातही मोठी घट झाल्याने राज्यात सर्वदूर पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामानाची निर्मिती झाल्यानंतर काही भागात पावसाची तुरळक हजेरी देखील लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये शुक्रवारी (ता.05) सकाळी किमान 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. (Weather Update)
शुक्रवारी (ता.05 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
जेऊर- 30.5/17.5, कोल्हापूर- 29.1/19.9, महाबळेश्वर- 26.1/15.3, मालेगाव- 28.8/16.6, नाशिक- 29.5/12.8, सांगली- 29.4/20.2, सातारा- 30.2/17.2, सोलापूर- 32.1/19.3, अकोला- 30.4/17.6, अमरावती- 29.0/17.0, बुलडाणा- 29.4/15.2, चंद्रपूर- 28.4/15.0, गडचिरोली- 29.0/15.2, गोंदिया- 27.8/14.8, नागपूर- 27.0/15.5, वर्धा- 27.5/17.0, वाशिम- 29.6/15.6, यवतमाळ- 30.0/15.0, छत्रपती संभाजीनगर- 29.0/15.6, नांदेड- 29.6/18.2, परभणी- 29.6/17.5, डहाणू- 26.7/17.4, मुंबई- 27.5/19.5, रत्नागिरी- 33.1/20.2