Weather Update : जळगाव जिल्हा वगळता राज्यभरात थंडी उरली फक्त नावाला, पावसाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा वगळता उर्वरित राज्यात आता थंडी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोकणासह मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रविवारी (ता.07) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. लक्षद्वीप बेटांजवळ कायम असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे हवेत सध्या कमी दाबाचा पट्टी सक्रीय आहे. त्यामुळेच राज्यात पावसाळी वातावरणाची निर्मिती झाली आहे.

रविवारी (ता. 07 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
जळगाव- 27.0/12.4, कोल्हापूर- 29.9/20.5, महाबळेश्वर- 25.6/15.0, मालेगाव- 25.0/16.8, नाशिक-26.4/16.9, सांगली- 30.3/20.3, सातारा- 30.9/17.2, सोलापूर- 32.2/20.1, अकोला- 29.0/17.6, अमरावती- 28.0/15.6, बुलडाणा- 27.5/16.7, चंद्रपूर- 27.0/14.4, गडचिरोली- 29.0/14.8, गोंदिया- 24.8/13.8, नागपूर- 25.6/16.6, वर्धा- 26.8/15.6, वाशिम- 28.6/17.2, यवतमाळ- 29.0/15.5, छत्रपती संभाजीनगर- 27.2/14.8, नांदेड- 29.6/16.6, परभणी- 28.7/14.4, डहाणू- 27.8/19.4, मुंबई- 29.2/21.8, रत्नागिरी- 32.1/21.2

WhatsApp Group
Previous articleEgg Rate Today : छत्रपती संभाजीनगरात अंड्यांना सर्वाधिक 6.73 रूपये प्रति नग दर
Next articleArtificial Intelligence : बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी