Weather Update : हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व धुळे जिल्ह्यात सोमवारी (ता.08) पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लक्षद्वीप बेटांजवळच्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी (ता. 08 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
कोल्हापूर- 29.3/19.1, महाबळेश्वर- 24.6/14.2, मालेगाव- 27.0/17.2, नाशिक- 28.8/17.4, सांगली- 29.4/19.8, सातारा- 30.4/16.6, सोलापूर- 32.4/18.6, अकोला- 29.5/17.2, अमरावती- 28.8/15.8, बुलडाणा- 28.0/16.0, चंद्रपूर- 29.0/15.0, गोंदिया- 28.5/13.6, नागपूर- 27.8/17.0, वर्धा- 27.5/16.5, वाशिम- 29.8/14.4, यवतमाळ- 29.7/16.2, नांदेड- 28.8/17.0, परभणी- 29.4/15.7, डहाणू- 27.3/20.0, मुंबई- 30.4/22.6, रत्नागिरी- 32.5/23.0