Weather Update : जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात आजही पावसाचा इशारा येलो अलर्ट

Weather Update : कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाने जळगावसह धुळे, नाशिक तसेच अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता.09) पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवार मराठवाडा भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणाच्या निर्मितीमुळे राज्यातील थंडीचा गारठा बऱ्याच अंशी कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमान घटले आहे.

मंगळवारी (ता. 09 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 28.2/18.4, जळगाव- 28.8/15.4, कोल्हापूर- 30.1/21.9, महाबळेश्वर- 25.7/15.4, मालेगाव- 28.8/17.2, सांगली- 29.9/22.2, सातारा- 31.2/20.2, सोलापूर- 31.8/21.3, अकोला- 30.8/16.0, अमरावती- 29.0/16.3, बुलडाणा- 29.6/16.4, चंद्रपूर- 29.2/14.0, गडचिरोली- 30.0, 15.2, गोंदिया- 29.8/14.4, नागपूर- 29.6/15.6, वर्धा- 30.2/16.0. वाशिम- 30.2/14.2, यवतमाळ- 30.5/15.0, छत्रपती संभाजीनगर- 29.4/16.2, परभणी- 30.2/17.0, उदगीर- 31.0/18.0, डहाणू- 33.2/20.6, मुंबई- 33.2/23.0, रत्नागिरी- 35.2/22.5

WhatsApp Group
Previous articleFlood Management Project : कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यास जागतिक बँकेचे अर्थसहाय्य
Next articleBanana Market Rate : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला मिळाला ‘इतका’ भाव