गावशिवार न्यूज | उत्तर भारताकडून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे अखेर राज्यात थंडीचे पुनरागमन झाले असून, रात्रीच्या किमान तापमानात जवळपास 5 ते 6 अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून, जळगावमध्ये सोमवारी (ता.15) सकाळी 9.9, नाशिकमध्ये 11.1 आणि छत्रपती संभाजीनगरात 10.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. थंडीचा गारठा वाढल्याने आता कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. (Weather Update)
रविवारी (ता.14 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 31.4/9.9, कोल्हापूर- 32.6/19.5, महाबळेश्वर- 27.7/14.5, मालेगाव- 32.4/12.4, नाशिक- 30.6/11.1, सांगली- 33.3/17.3, सातारा- 32.1/15.0, सोलापूर- 34.8/17.0, अकोला- 32.5/13.0, अमरावती- 31.2/12.5, बुलडाणा- 30.7/12.2, चंद्रपूर- 32.0/15.4, गडचिरोली- 30.0/14.8, गोंदिया- 30.4/15.4, नागपूर- 31.4/16.6, वर्धा- 32.0/15.9, वाशिम- 32.4/11.4, यवतमाळ- 33.0/12.0, छत्रपती संभाजीनगर- 30.8/10.2, नांदेड- 31.8/15.4, परभणी- 31.8/14.6, डहाणू- 31.0/17.0, मुंबई- 32.6/22.0, रत्नागिरी- 34.3/20.2