जळगावसह सात जिल्ह्यात आज गुरूवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Weather Update : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर आता थोडा कमी झाला असला तरी ढगाळ वातावरण अद्याप कायम आहे. गुरुवारी (ता.30) देखील जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

Chance of rain with lightning in seven districts including Jalgaon on Thursday

भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ श्री. माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, विदर्भासह खान्देशातील जळगाव व धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आगामी तीन दिवसांच्या कालावधीत म्हणजेच शुक्रवारपर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे दिसून आली आहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मात्र सगळीकडे आभ्राच्छादीत वातावरणाची निर्मिती होईल. प्रत्यक्षात पाऊस तुरळक ठिकाणीच पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ श्री.माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. शनिवारपासून अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

थंडीचा कडाका आता वाढणार

गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी जेवढ्या काही जिल्ह्यात लागत आहे, त्याठिकाणी दिवसाच्या व रात्रीच्या किमान तापमानात जवळपास 4 अंश सेल्सिअसने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढल्याने दिवसाही घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. थंडीचा कडाका वाढल्यानंतर अर्थातच सकाळच्या प्रहरी मोठ्या प्रमाणात ओस पडू लागला आहे. त्याचा फायदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका पिकांना होऊ शकणार आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या गुरूवारी (ता. 30 नोव्हेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleअरे देवा, कपाशीला मिळणार नाही म्हणे पिकविम्याचे संरक्षण