जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट, बुधवारी सकाळी 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

गावशिवार न्यूज | उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात गेल्या दोन दिवसात चांगलीच घट झाली आहे. बुधवारी (ता.17) सकाळी विशेषतः जळगाव जिल्ह्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली. विदर्भातही किमान तापमाचा पारा हळूहळू घसरताना दिसत आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात मात्र कमाल व किमान तापमानात लक्षणीय असा बदल अद्याप झालेला नाही. (Weather Update)

बुधवारी (ता.17 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 29.8/9.3, अहमदनगर- 29.9/11.7, कोल्हापूर- 31.2/17.0, महाबळेश्वर- 25.8/14.0, मालेगाव- 28.8/13.4, नाशिक- 30.7/11.5, सांगली- 31.6/16.6, सातारा- 32.3/13.0, सोलापूर- 34.0/15.8, अकोला- 30.8/13.6, अमरावती- 29.8/13.5, बुलडाणा- 29.8/11.5, चंद्रपूर- 31.6/15.4, गोंदिया- 28.6/14.8, गडचिरोली- 29.2/13.8, नागपूर- 29.7/15.0, वर्धा- 30.514.5, वाशिम- 31.7/13.2, यवतमाळ- 31.5/14.5, नांदेड- 31.8/16.0, परभणी- 31.2/15.5, डहाणू- 27.1/15.6, मुंबई- 28.6/20.0, रत्नागिरी- 30.2/18.2

WhatsApp Group
Previous articleबुधवारी (17 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
Next articleसेंद्रिय शेतीवर शुक्रवारी कार्यशाळा, शरद पवारांची खास उपस्थिती