जळगावसह धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी थंडी

गावशिवार न्यूज | राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कमाल व किमान तापमानात चढउतार होत असताना, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी थंडी टिकून आहे. शनिवारी (ता.20) सकाळी विशेषतः जळगाव जिल्ह्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान 11.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातही 12.7 किमान तापमान नोंदविण्यात आले. (Weather Update)

शनिवारी (ता.20 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 28.8/11.0, अहमदनगर- 29.8/14.4, कोल्हापूर- 29.6/17.5, महाबळेश्वर- 24.8/14.0, मालेगाव- 26.8/14.0, नाशिक- 29.3/12.7, सांगली- 30.3/18.1, सातारा- 30.8/14.6, सोलापूर- 33.8/18.6, अकोला- 30.2/17.4, अमरावती- 30.0/15.7, बुलडाणा- 29.4/15.0, चंद्रपूर- 30.0/15.4, गडचिरोली- 30.0/16.4, गोंदिया- 26.0/14.0. नागपूर- 28.2/17.2, वर्धा- 28.2/16.6, वाशिम- 31.2/15.4, यवतमाळ- 31.5/16.3, छत्रपती संभाजीनगर- 29.4/14.4, नांदेड- 30.8/18.6, परभणी- 31.4/17.0, डहाणू- 28.6/16.9, मुंबई- 29.0/20.2, रत्नागिरी- 30.0/20.4

WhatsApp Group
Previous articleमधमाशांमुळे परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत होऊ शकते वाढ
Next articleशासनाकडून वैयक्तिक शेततळ्यांसाठी 40 कोटी रूपयांचा निधी मंजूर