किमान तापमानात चढ-उतार, जळगावमध्ये रविवारी सकाळी 10.2 अंश सेल्सिअस तापमान

गावशिवार न्यूज | राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल व किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा बऱ्यापैकी खाली आला आहे. जळगाव जिल्ह्यात रविवारी (ता. 21) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातही किमान 12.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. (Weather Update)

रविवारी (ता. 21 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 29.8/10.2, कोल्हापूर- 30.1/17.5, मालेगाव- 28.8/13.8, नाशिक- 29.1/12.0, सांगली- 30.6/17.6, सातारा- 29.7/14.0, सोलापूर- 33.2/18.4, अकोला- 30.8/15.5, अमरावती- 29.4/15.5, बुलडाणा- 29.2/12.8, चंद्रपूर- 30.4/15.0, गडचिरोली- 29.4/15.2, गोंदिया- 27.8/14.5, नागपूर- 29.0/16.5, वर्धा- 29.2/17.2, वाशिम- 31.2/14.2, यवतमाळ- 31.0/15.5, नांदेड- 31.4/19.6, परभणी- 32.5/16.7, उदगीर- 31.0/17.8, डहाणू- 26.5/16.4, मुंबई- 28.6/19.8, रत्नागिरी- 31.0/19.3

WhatsApp Group
Previous articleहिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला मिळाला सर्वाधिक भाव
Next articleप्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, जैन इरिगेशनतर्फे चौकांसह उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई