उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा गारठा कायम, नगर 8.5 अंश सेल्सिअस

गावशिवार न्यूज | उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यात तसेच विदर्भात थंडीचा गारठा अद्याप कायम आहे. हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार शनिवारी (ता. 27) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासात नगरमध्ये 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. जळगावमध्ये 9.9 तसेच मालेगावात 10.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. कोकण किनारपट्टीचा भाग वगळता राज्यभरातील किमान तापमान हे कमी-अधिक फरकाने 15 अंशाच्या खालीच आहे. (Weather Update)

शनिवारी (ता. 27 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 29.2/9.9, अहमदनगर- 28.0/8.5, कोल्हापूर- 30.4/18.6, महाबळेश्वर- 26.1/14.5, मालेगाव- 25.8/10.0, नाशिक- 31.6/11.8, सांगली- 31.0/18.1, सातारा- 30.7/16.0, सोलापूर- 33.1/19.4, नांदेड- 28.4/15.6, परभणी- 30.1/13.8, उदगीर- 30.0/15.2, अकोला- 30.7/12.0, अमरावती- 28.4/13.3, बुलडाणा- 29.5/12.5, चंद्रपूर- 29.2/11.0, गडचिरोली- 29.6/11.4, गोंदिया- 26.6/10.5, नागपूर- 27.5/11.1, वर्धा- 27.2/11.6, वाशिम- 30.6/11.0, यवतमाळ- 32.0/11.0, डहाणू- 31.0/17.0, मुंबई- 32.0/20.7, रत्नागिरी- 35.4/21.0

WhatsApp Group
Previous article‘या’ कारणांमुळे मधुमेही रूग्णांसाठी गुणकारी मानले जाते कडू कारले
Next article‘आरा’ रंगीत द्राक्ष वाणांच्या दुसऱ्या सेल ‘डे’ ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद