राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच किमान तापमानात झाली वाढ

गावशिवार न्यूज | हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात फेब्रुवारी महिन्याची सुरूवात होत नाही तेवढ्यात किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली आहे. दिवसाचे कमाल तापमान देखील 30 अंशावर गेले आहे. शुक्रवारी (ता. 02 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये किमान 12.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. जळगावमध्येही 12.8 अंश तापमान नोंदविण्यात आले. (Weather Update)

शुक्रवारी (ता. 02 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 29.0/13.5, जळगाव- 31.1/12.8, कोल्हापूर- 29.7/15.6, महाबळेश्वर- 23.5/12.0, नाशिक- 28.0/13.4, सांगली- 30.5/13.9, सातारा- 29.7/13.5, सोलापूर- 34.0/16.6, अकोला- 32.0/14.8, अमरावती- 30.6/16.5, बुलडाणा- 29.0/15.8, चंद्रपूर- 31.0/17.8, गडचिरोली- 29.6/14.2, गोंदिया- 29.6/16.2, नागपूर- 30.1/17.4, वर्धा- 31.5/17.4, वाशिम- 31.6/13.6, यवतमाळ- 32.5/14.7, छत्रपती शिवाजीनगर- 29.4/15.4, नांदेड- 31.4/16.2, परभणी- 31.4/15.5, डहाणू- 29.1/18.4, मुंबई- 28.6/20.2, रत्नागिरी- 30.5/17.6

WhatsApp Group
Previous articleचाळीसगाव तालुक्यातील पाच तलावांच्या संवर्धनासाठी 18.28 कोटी रूपयांचा निधी
Next articleतापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पातून जूनपर्यंत पाणी अडविण्याचे नियोजन