पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानात आज सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता

गावशिवार न्यूज | पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज सोमवारी (ता. 05) पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील दोन- तीन दिवसांत किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानात बऱ्यापैकी वाढ झाली असून, रात्रीचा गारठा देखील कमी झाला आहे. (Weather Update)

प्राप्त माहितीनुसार, रविवारी (ता. 04) जम्मू-काश्मीर तसेच लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. हरियाणामध्येही बऱ्याच ठिकाणी, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी, पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी आणि पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. दिल्लीत सुद्धा ढगाळ आकाश होते काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.

सोमवारी (ता. 05 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
कोल्हापूर- 32.7/20.7, महाबळेश्वर- 27.6/16.8, नाशिक- 33.5/16.5, सांगली- 33.4/20.1, सातारा- 32.8/18.5, सोलापूर- 35.4/20.8, अकोला- 34.3/17.6, अमरावती- 32.0/16.9, बुलडाणा- 33.0/18.2, चंद्रपूर- 32.2/14.8, गडचिरोली- 31.6/16.0, गोंदिया- 31.4/15.5, नागपूर- 32.2/15.8, वर्धा- 32.8/17.0, वाशीम- 32.2/17.8, यवतमाळ- 34.0/20.0, परभणी- 32.8/18.2, उदगीर- 32.8/19.5, डहाणू- 30.9/19.0, मुंबई- 32.8/21.8, रत्नागिरी- 34.2/21.7

WhatsApp Group
Previous articleसोमवार (ता. 05 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleराज्यात अंड्यांना सोमवारी 600 रूपये प्रति शेकडा दर, 05 रूपयांची घट