गावशिवार न्यूज | राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यातील किमान व कमाल तापमानात आता चांगलीच वाढ झाली आहे. उकाड्यातही बरीच वाढ झाली असून, पावसाला पोषक वातावरणाची हळूहळू निर्मिती होताना दिसते आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात शुक्रवार (ता.09) पासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (Weather Update)
बुधवारी (ता. 07 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 33.8/15.3, जळगाव- 33.2/14.5, कोल्हापूर- 35.1/21.0, महाबळेश्वर- 28.9/18.1, नाशिक- 32.9/14.8, पुणे- 35.1/16.1, सांगली- 35.5/20.0, सातारा- 34.5/17.6, सोलापूर- 37.2/20.9, अकोला- 35.1/17.4, अमरावती- 33.4/17.5, बुलडाणा- 33.0/16.8, चंद्रपूर- 33..8/17.6, गडचिरोली- 32.0/17.0, गोंदिया- 32.3/15.6, नागपूर- 34.2/18.6, वर्धा- 34.5/18.0, वाशीम- 35.2/16.4, यवतमाळ- 35.0/18.2, छत्रपती संभाजीनगर- 33.0/17.0, परभणी- 34.6/18.4, डहाणू- 29.4/20.4, मुंबई- 30.8/22.2, रत्नागिरी- 33.8/21.1