विदर्भासह मराठवाड्यात आज शनिवारी विजांसह पावसाचा येलो अलर्ट

गावशिवार न्यूज | उत्तर भारतात आता थंडीची लाट आली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार झारखंडमध्ये किमान तापमान हे 5 ते 10 अंशांच्या दरम्यान आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून विदर्भासह मराठवाड्यात आज शनिवारी (ता. 10) विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. (Weather Update)

शनिवारी (ता. 10 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 33.0/13.5, जळगाव- 29.4/13.5, कोल्हापूर- 35.6/18.6, महाबळेश्वर- 29.7/16.0, नाशिक- 32.3/12.8, सांगली- 36.3/18.3, सातारा- 35.7/13.0, सोलापूर- 37.8/21.0, अकोला- 32.0/17.6, अमरावती- 31.8/15.9, बुलडाणा- 31.0/15.6, चंद्रपूर- 33.4/16.0, गडचिरोली- 30.6/14.8, गोंदिया- 28.9/12.9, नागपूर- 29.2/16.0, वर्धा- 30.0/16.2, वाशीम- 30.6/15.6, यवतमाळ- 32.5/18.2, छत्रपती संभाजीनगर- 31.6/15.6, नांदेड- 32.4/20.0, परभणी- 32.7/18.3, डहाणू- 27.9/19.5, मुंबई- 29.5/19.5, रत्नागिरी- 32.7/17.6

WhatsApp Group
Previous articleशनिवार (ता. 10 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleजळगावचे केळी उत्पादक पीकविम्यासाठी आता उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार