उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान पुन्हा घटले, विदर्भात मात्र पावसाळी वातावरण

गावशिवार न्यूज | ढगाळ हवामान निवळल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे तसेच नाशिक जिल्हा तसेच पुण्यातील किमान तापमान पुन्हा घटले आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाळी वातावरणाची निर्मिती झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देखील दिला आहे. (Weather Update)

रविवारी (ता. 11 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 32.2/13.0, कोल्हापूर- 34.1/18.5, महाबळेश्वर- 30.3/16.6, मालेगाव- 29.6/15.4, नाशिक- 32.8/12.0, पुणे- 35.8/11.6, सांगली- 35.5/17.7, सातारा- 34.7/14.7, सोलापूर- 36.4/22.5, अकोला- 33.3/20.3, अमरावती- 32.0/18.9, बुलडाणा- 32.8/17.0, चंद्रपूर- 31.0/16.4, गडचिरोली- 30.2/17.4, गोंदिया- 28.5/17.3, नागपूर- 29.0/18.6, वर्धा- 30.0/19.2, वाशीम- 32.8/16.6, यवतमाळ- 32.5/19.0, छत्रपती संभाजीनगर- 33.5/14.6, नांदेड- 32.6/20.8, परभणी- 35.1/18.5, डहाणू- 28.8/18.4, मुंबई- 30.0/18.8, रत्नागिरी- 34.4/17.1

WhatsApp Group
Previous articleरविवार (ता. 11 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleकोरडवाहूसाठी उपयुक्त, रस शोषणाऱ्या किडींना प्रतिकारक कापसाच्या वाणाची शिफारस