गावशिवार न्यूज | राज्यभरात किमान व कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. सध्या सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत असून, हवामान बदलाचा मोठा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे. दरम्यान, उन्हाळ्याची चाहुल लागल्याने शेतकऱ्यांनी आता परिपक्व अवस्थेतील ज्वारी, हरभरा तसेच गहू यासारख्या रब्बी पिकांच्या काढणीला वेग दिला आहे. (Weather Update)
शुक्रवारी (ता. 16 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 33.2/18.3, जळगाव- 32.3/15.0, कोल्हापूर- 34.1/19.1, महाबळेश्वर- 28.8/16.8, मालेगाव- 32.8/16.6, नाशिक- 32.1/18.5, सांगली- 34.8/19.5, सोलापूर- 34.0/20.8, अकोला- 33.8/20.0, अमरावती- 31.8/18.0, बुलडाणा- 32.5/17.2, चंद्रपूर- 33.2/16.8, गडचिरोली- 32.2/16.0, गोंदिया- 30.9/17.6, नागपूर- 30.4/18.6, वर्धा- 31.9/19.2, वाशीम- 33.2/16.6, यवतमाळ- 33.0/18.0, छत्रपती संभाजीनगर- 32.5/19.1, बीड- 34.6/19.0, परभणी- 33.6/19.4, अलिबाग- 29.5/17.7, डहाणू- 29.1/20.4, मुंबई- 29.8/21.8, रत्नागिरी- 34.6/20.3