पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

Weather Update : हवामान खात्याने रविवार (ता. 25 फेब्रुवारी) दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची व गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे राज्याच्या उर्वरित भागात मात्र किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली असून, त्यामुळे गारठा वाढलेला आहे.

शनिवारी (ता. 24 फेब्रुवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 31.4/12.4, अहमदनगर- 33.0/10.6, कोल्हापूर- 32.1/17.5, महाबळेश्वर- 27.9/16.0, मालेगाव- 32.2/14.0, नाशिक- 30.4/12.2, सांगली- 32.9/17.0, सातारा- 32.9/12.8, सोलापूर- 35.4/17.4, अकोला- 32.7/15.3, अमरावती- 31.6/17.7, बुलडाणा- 30.0/15.0, चंद्रपूर- 33.0/16.0, गडचिरोली- 33.4/16.4, गोंदिया- 30.8/15.4, नागपूर- 31.0/17.8, वर्धा- 32.5/16.5, वाशीम- 35.6/13.8, यवतमाळ- 34.0/14.5, छत्रपती संभाजीनगर- 30.9/13.4, बीड- 31.2/13.8, परभणी- 32.9/16.1, डहाणू- 29.1/18.1, मुंबई- 29.5/21.2, रत्नागिरी- 30.6/17.8

WhatsApp Group
Previous articleशनिवार (ता. 24 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleरविवार (ता. 25 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव