नाशिक, पुणे, जळगाव जिल्ह्यातील तापमानात घट, गारठा वाढला

Weather Update : अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यातील किमान तापमानात काहीअंशी घट झाली असून, थंडीचा गारठा वाढल्याची प्रचिती येऊ लागली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात निच्चांकी 14.8 अंश सेल्सिअस तसेच पुणे जिल्ह्यात 15.4 अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात 15.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.

In Nashik, Pune, Jalgaon district, the temperature dropped, the hail increased

रात्रीच्या किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाल्यानंतर दिवसाच्या कमाल तापमानात तुलनेत फार घट झालेली दिसत नाही. प्राप्त माहितीनुसार सद्यःस्थितीत कोकण किनारपट्टीच्या भागात रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 34.0 अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. खालोखाल सांताक्रुझमध्ये 32.9 अंश सेल्सिअस, सोलापुरात 31.0 अंश सेल्सिअस, डहाणूमध्ये 30.1 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 29.5 अंश सेल्सिअस, सातारा आणि निफाडमध्ये 29.0 अंश सेल्सिअस, पुण्यात 29.6 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 29.1 अंश सेल्सिअस, सांगली आणि जळगावमध्ये 28.5 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 26.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. वातावरण निरभ्र झाल्यानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, शेतकरी वर्गातुनही रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांच्या जोमदार वाढीसाठी थंडीची प्रतीक्षा केली जात आहे.

WhatsApp Group
Previous articleकेंद्र सरकारच्या पथकाकडून जळगावसह सात जिल्ह्यांची सोमवारपासून दुष्काळ पाहणी
Next articleशरद पवारांनी आंदोलनाची भाषा करताच कांद्यासाठी फडणवीसांचे केंद्राला साकडे