Weather Update : अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र, आकाश निरभ्र झाल्यानंतर आता पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास सुरूवात झाली आहे. विदर्भात रात्रीच्या किमान तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिसपर्यंत खाली आला असून, उर्वरित राज्यातही थंडीचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
The harshness of winter is gradually increasing in the state, Vidarbha has become cold
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील मालदीव बेटांजवळ समुद्र सपाटीपासून साधारण दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तरीही राज्यात मिचौंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेले ढगाळ व पावसाळी वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. दिवसाच्या तापमानात मात्र फार फरक जाणवलेला नाही. दव आणि धुक्याचे प्रमाण जास्त राहत असल्याने थंडीचा कडाका सकाळी साधारण 9 ते 10 वाजेपर्यंत जास्त प्रमाणात जाणवतो. थंडीचे प्रमाण जसजशे वाढत आहे तसतशी रब्बी पिकांची वाढ ही जोमदारपणे होत असल्याने शेतकरी वर्गानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सध्या शेती शिवारात दादर ज्वारी, हरभरा, मका पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. कपाशीचे पीक उपटून त्या जागी गव्हाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीही लगबग सुरू आहे.
मंगळवारी (ता.12) सकाळपर्यंतच्या 24 तासात घेण्यात आलेली कमाल व किमान तापमानाची नोंद :
चंद्रपूर- 28.2/13.0, गोंदिया- 26.9/13.2, नागपूर- 28.0/14.4, वर्धा- 28.0/14.5, अहमदनगर- 28.8/14.3, कोल्हापूर- 30.2/19.0, महाबळेश्वर- 26.6/15.5, पुणे- 31.0/15.7, सांगली- 30.1/17.9, सातारा-30.4/17.4, बीड- 28.0/16.2, नांदेड- 29.6/16.2, परभणी- 30.1/14.5
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)