राज्यातील किमान तापमानाचा पारा खालावला, सर्वत्र थंडीची चाहूल

Weather Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात रात्रीच्या किमान तापमानाचा पारा आता खाली आला असून, गारठा वाढल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात थंडीचे पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्गातूनही त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

The mercury of the minimum temperature in the state has dropped, cold weather everywhere

हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, कोल्हापूर तसेच सोलापूर, अकोला आणि सांगली जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपेक्षा कमीच आहे. त्यातही विदर्भातील गोंदिया तसेच गडचिरोली, चंद्रपूर भागातील तापमान 14 अंशापेक्षाही कमी आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही आता बऱ्यापैकी घट झाली आहे. तरीही जळगाव तसेच सोलापूर, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्तच आहे. त्याठिकाणी दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडीचा गारठा, अशी परिस्थिती त्यामुळे अनुभवण्यास मिळत आहे.

बुधवारी (ता.13 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 30.2/15.2, अहमदनगर- 28.2/14.3, कोल्हापूर- 29.6/18.5, महाबळेश्वर- 25.3/14.4, मालेगाव- 27.6/15.8, नाशिक- 29.8/14.1, पुणे- 31.4/15.0, सांगली- 29.5/17.1, सातारा- 30.0/15.4, सोलापूर- 31.8/17.5, छत्रपती संभाजीनगर- 28.6/15.2, नांदेड- 29.2/17.2, परभणी- 29.3/16.1, अकोला- 30.6/17.0, अमरावती- 28.6/15.1, बुलडाणा- 28.4/15.6, चंद्रपूर- 28.4/14.0, गडचिरोली- 29.0/13.8, गोंदिया- 27.6/13.6, नागपूर- 28.4/14.6, वर्धा- 28.0/15.0, वाशीम- 29.4/14.8, यवतमाळ- 31.0/15.5

WhatsApp Group
Previous articleबऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाचे काम सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात
Next articleराज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांनाच भेट देणार केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक