शासन द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी वाईन उद्योग प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविणार

गावशिवार न्यूज | कोविडच्या काळात 2020/21 मध्ये बंद करण्यात आलेली वाईन उद्योग प्रोत्साहन योजना आणखी पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सदरची योजना पुन्हा सुरू झाल्याने विशेषतः नाशिक तसेच सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे. (wine industry)

कोविड काळात बंद पडलेली वाईन उद्योग प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी राज्यातील द्राक्ष उत्पादकांमधून केली जात होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरची योजना आगामी पाच वर्षांसाठी पुन्हा राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत सन 2020/21, सन 2021/22 तसेच सन 2022/23 या वर्षात वाईनरी उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या 16 टक्के प्रमाणे व्हॅटचा परतावा उद्योजकांना देण्यात येईल. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे त्यास पुढील वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp Group
Previous articleरेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा, शासन सिल्क समग्र-2 योजना राबविणार
Next articleमहाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात कशी काय मिळते स्वस्त साखर ?