हिवाळी अधिवेशनात 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद

Winter Session 2023 : नागपूरच्या विधीमंडळ सभागृहात गुरूवारी (ता.07) सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 55 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यातून शेतकऱ्यांसाठीही मोठी तरतूद केली आहे. तत्पूर्वी राज्य शासनाने तीन विधेयकांना पटलावर सादर केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमती मिळालेल्या त्या विधेयकांना राज्यपालांची मान्यता मिळालेली असल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

Big provision for farmers in supplementary demands of 55 thousand crores in winter session 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेल्या सुमारे 55 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्यांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे सुमारे 4283 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता भरण्यासह नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी निधीची तरतूद करण्यासाठी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. मोदी आवास योजना तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलंतीच्या प्रतिपूर्तीसाठी देखील निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये प्रस्तावित आहे. तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे वेतन, नागरी भागातील रस्ते व एमएसएमई साठी निधीची तरतूद पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर निधीतून केली जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्याबद्दलची माहिती सभागृहाला दिली.

WhatsApp Group
Previous articleहिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधकांची मागणी
Next articleउद्या शुक्रवारी (ता.08 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव