हवामान तज्ज्ञ म्हणतात…यंदाच्या हिवाळ्यात भरणार नाही हुडहुडी

Winter Update : हिवाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप थंडीचा कुठेच कडाका जाणवलेला नाही. त्यात हवामान खात्याने यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारीच्या कालावधीत थंडीच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.

Weather experts say… this winter will not be cold

हिवाळ्यातील डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यातील सरासरी तापमानाचा अंदाज, त्याचप्रमाणे चालू डिसेंबर महिन्यातील कमाल व किमान तापमान व पावसाचा अंदाज याबाबतची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. डॉ. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर महिन्यातील किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्तच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य आणि उत्तर भारत वगळता देशाच्या इतर भागातील दिवसाचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्तच राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात निर्माण झालेले दोन कमी दाब क्षेत्र, मिधीली चक्रीवादळ, पश्चिमी चक्रावात, पूर्वेकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह, मेडियन ज्युलियन असोलेशन आदी काही घटक पूरक ठरल्यामुळेच महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडल्याचेही डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

थंडी गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

यावर्षीच्या हिवाळ्यात सुरुवातीचे दोन महिने किमान तापमान हे अधिकच राहिले आहे. अवकाळी पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढून होती नव्हती तेवढी थंडीही आता गायब झाली आहे. रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाणारी थंडी कमी झाल्याने शेतकरी वर्गातूनही त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

WhatsApp Group
Previous articleखान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता
Next articleशासनाने दुधाला 5 रूपये प्रतिलिटर अनुदान द्यावे, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी